कोण बोल देई तुम्हा I
कोण बोल देई तुम्हा । घनश्यामा आत्मारामा ! ॥ धृ ॥
ही आमुची पात्रता । साक्षि आम्हीच अनंता ॥ १ ॥
व्यर्थ बोलोआम्ही दास । आम्हा मायिकांची आस ॥ २ ॥
तुकड्या म्हणे तू कळशी । नुरता चांचल्य मानसी ॥ ३ ॥