आम्ही काय दीन जन ।
.आम्ही काय दीन जन । जाणो परमार्थाची खूण ? ॥ धृ ॥
नाही आम्हा अनुभव । नाही शास्त्रांचाहि ठाव ॥ १ ॥
भावे गाऊ हरिनाम । चरणी ठेवूनिया प्रेम ॥ २ ॥
तुकड्या म्हणे भोळी सेवा । मान्य व्हावी माझी देवा? ॥ ३ ॥