जरी उंच तुझे पाय I
जरी उंच तुझे पाय । तरी आम्हा रंका काय ॥ धृ ॥
जाऊ तिथे धाडसाने । तुझे घ्यावया दर्शने ॥ १ ॥
फेडू मेदाभेद सारे । तोडू अवस्थेची दारे ॥ २ ॥
तुकड्या म्हणे जावो प्राण । आम्ही सोडू ना चरण ॥ ३ ॥