तू तो निकटचि आहे I
तू तो निकटचि आहे । परी चित्त भ्रमे पाहे ॥ धृ ॥
पाहे दाराच्या परता । तुझी अंतरीच सत्ता ॥ १ ॥
सांग सांग तुझ्याविण । देतो प्रकाश हा कोण? ॥ २ ॥
तुकड्या म्हणे स्वयंज्योति । एक तुझी आत्म मूर्ति ॥ ३ ॥