तूचि बसोनी अंतरी I
तूचि बसोनी अंतरी । देवा! खेळसी साचारी ॥ धृ ॥
तूचि झाला नारी नर । तुझेचि हे जगडंबर ॥ १ ॥ नाही तुझ्याविणसत्ता । कोठे जराही अनंता! ॥ २ ॥
तुकड्या म्हणे मी मी म्हणे । तोचि दुःखी होय येणे ॥ ३ ॥