आम्ही जाणितला भाव I
आम्ही जाणितला भाव । देवा! तू लीला लाघव ॥ धृ ॥
उगीच देशी बोल जीवा । करणे तुझे हे केशवा ॥ १ ॥ सांग कोणे सृष्टि केली?। कोणा वासना ही झाली ? ॥ २ ॥
तुकड्या म्हणे निर्गुणपुरी । सोडुनि का आला भूवरी? ॥ ३ ॥