तू तो तैसाची राहसी I
तू तो तैसाची राहसी । फेर आमुच्या मानसी ॥ धृ ॥
नाही तुज येणे जाणे । आम्ही भ्रमो अल्पज्ञाने ॥ १ ॥
तू तो सर्वांतरी साक्षि । आम्ही जीवाच्या सापेक्षी ॥ २ ॥
तुकड्या म्हणे चुकलो आम्ही। म्हणुनी अंतरलो नामी ॥ ३ ॥