जे तुज जाणती भावाने I
जे तुज जाणती भावाने । भजती अंतरी चिंतेने ॥ धृ ॥
तया कळले सारे वर्म । लीलाधारी मेघश्याम ॥ १ ॥
जिकडे पाहे तिकडे दिसे । रिते तुझ्याविण नसे ॥ २ ॥
तुकड्या म्हणे सत्संगति । तेणे कळसी तू श्रीपति! ॥