सत्य हे उमगले, जाहली स्फुरणा

( चालः जागरे लवकरी कुणी . . . ) 
सत्य हे उमगले, जाहली स्फुरणा ! 
सत्संगतीविण, ना  चुके   ही   यातना ।।धृ०॥ 
जन्म - मरण भोग सारे , वासनी भरले ! 
जोवरि न कळे , आत्म स्वरुप हे - 
तोवरि भरणे , सुख - दुःखादी भोगना ! ।।१।। 
सत्य ज्ञानची मार्ग दावी , शांतिचा निर्भ्रांत तो ! 
अनुभवाविण कोणी न सांगे - 
त्या अंतरीच्या, क्षराक्षराच्या   कल्पना !  ॥२॥ 
जागलो निद्रेतुनिया , अंध : कारा सारुनी । 
गुरु भक्तीने , अचुकची दिसले - 
तुकड्यादासा, ते मूळचेची   ब्रह्म   ना ? ।।३।। 
                        - गुरुकुंज आश्रम , दि . ०४ - ११ - १९५९