साध रे ! संगति साधूची
( राग मांड ; ताल : अध्धा तीन ताल )
साध रे ! संगति साधूची ,
तरेल काया ही बुडत्याची ,
चिंता निरस अंधाराची ! ॥धृ०॥
मग शांतीचा पारचि नाही ।
वाट मिळे जणू स्वर्ग - सुखाची ।।
ऐक ! ऐक ! ! ही हाक आमुची ।
विसरु नको ही मात जिवाची ! ॥१॥
कोण मी ? कुठला कोठुनि आलो ?
निज स्वरुपाला विसरुनि गेलो ! !
खुलेल सगळी , आस मनाची ।
पुरेल आशा मग तुकड्याची ! ।।२।।
-गुरुकुंज , दि . ०४ - ११ - १९५९