जाऊ कुठे रे , पाह कुठे रे ! !

( चाल : चाहे पास हो . . . . ) 
जाऊ कुठे रे , पाह कुठे रे ! ! 
तुझ्या वाचोनी मन    ना   सावरे ॥धृ०॥ 
जाळ हे पसरल वरी वासनेच । 
काम - क्रोध सारे सदा देती त्रास ।। 
मार्ग कोणी ना सांगे सावकाश । 
म्हणुनिया चित्त झाल हे उदास ।। 
झाले हे उदास , धीरे धीरे रे ! 
नाम स्मरि रे ! ।। तुझ्या वाचोनी0 ।।१।। 
कोणापाशी जाऊ ? - सांगावया मात । 
ऐकावया कोण आहे मानवात ? । । 
कोण मज घेई अपुल्या सांगात । 
तुकड्यादास म्हणे पाहू नको अंत । । 
नको पाहु अंत , पार करी रे ! 
उध्दार करी रे ! । । तुझ्या वाचोनी ।।२।।