तव नाम गुण गाता , मन स्थीर हे असू दे ! !
( चाल : पंजाबी नगमा . . )
तव नाम गुण गाता , मन स्थीर हे असू दे ! !
दुसरे न सुचो काही , प्रभु तूच - तू सुचू दे । । धृ । ।
संसार दुःख - मुळ , शांती न कोणि पावे ।
सुख - दुःख भोग सारे , का यातची मरावे ?
कळले अता जिवाला , हा मार्गची नसू दे । । १ । ।
जिव बावरा पिसाळी , विषयास लंपटोनी ।
स्वानापरी भुंकाळे , परका दिसेल कोणी । ।
हे सर्व मीच आहे , निज - ज्ञान हे कळू दे । । २ । ।
हे विश्व या प्रभूचे , अम्ही लेकरे तयाची ।
राहू सदा मिळोनी , आनंद भोगण्यासी । ।
तुकड्या म्हणे , प्रभू रे सर्वत्र हे सुचू दे ! । । ३ । ।
- गुरुकुंज , दि . ०५ - ११ - १९५९