तुज कुणि प्रभु सांगितले ?
( चालः सुर सुखणी तू विमला . . . )
तुज कुणि प्रभु सांगितले ? अजुनी नाही आले !
अंतरीच मज कळले ! चरण मार्गि या वळले ॥ धृ० ॥
मधु सुगंध दरवळला ! पूष्पसडा हा पडला !
झुकली ही वृक्ष - लता ! सुख धाले० ॥ १ ॥
कोमल ही रवि - किरणे , पक्षांचे किलबिलणे ।
मंदमंद वायु सरे । उषःकाले ! । । २ । ।
दोन्हिकडे भक्त दिसे , गाई - वत्स खेळतसे ।
तुकड्याचे दर्शन. का - ! अन्तरले ! । । ३ । ।
- गुरुकुंज , दि . ०२ - ११ - १९५९