येरे माधवा , येरे केशवा

( चाल : मुझे ना भुलाओ . . . ) 
येरे माधवा , येरे केशवा ! 
भेटीसाठी      जीवभाव    करितो    धावा ॥ धृ० ॥ 
कोठे लपुनीया जणू , बैसला दडोनी । 
आम्ही भीरि - भीरि तुला , त्रासलो बघोनी । 
आळविता तुज कंठे , शिणली ही वाणी । 
किती जन्म गेले कान्हा ! भेटशी तु केधवा ? | | १ | | 
पोरकेचि तुझ्याविण जीवन सारे ।
कोण आम्ही विचारील भरल्या विकारे ? 
चहूकडे दूर - दूर , जैसे हिंडते हरीण ! 
कोठे शांति नाही हरी रे ! काही या   जीवा । । २ । । 
जीव जाळोनिया तुज , ओवाळीन वाती । 
भाव - भक्ति करोनिया , करीन आरती । 
दास तुकड्याची करुणा अता घेइना । 
पायी   मुक्ति    देई ,    इच्छितो   हे    राघवा ॥ ३ ॥