गवळणी किती वेळा गासी ?
( चाल : मुकुंदा रुसू नको इतका . . . )
गवळणी किती वेळा गासी ?
अजुनिया झालिच नाही खुशी ? ॥ धृ० ॥
कृष्ण गवळणी खेळुनी गेले ।
सार्थक त्यावेळी अनुभवले । ।
बहूत दिवस झाली ती कहाणी l
वेळ ती , ही नाही रे तशी । । गवळणी ॥ १ ॥
वीर अर्जुना - सम तू व्हावे ।
सज्ज आपुल्या कार्यां रहावे । ।
हेच गीत गावे गीतेचे l
न होवो , याहुनि आता खुशी । । गवळणी ॥ २ ॥
कळते का अपुल्याला लीला ?
लीलेने भारत उध्दरला ! !
दृष्टांचा संहार करोनी .
राखिले भक्त मालिकेसी । । गवळणी । । ३ । ।
म्हणुनि सांगतो अर्थ समजी तो -
खेळत - खेळत युध्द जिंकितो ।
तुकड्यादास म्हणे , त्रैलोकी -
जाहली , कीर्ति तयाची तशी । । गवळणी ॥ ४ ॥
- शिरस देवी दि . १८ - ०९ - १९६१