लक्ष पुरवुनी पाही प्राण्या !
(चालः दीनदयाळा रामा ! कामा..)
लक्ष पुरवुनी पाही प्राण्या ! दरबार तो विठूचा ॥धृ०॥
भूमि गादी करूनि आधी तंबू दिला नभाचा I
वृक्ष - बगीचे लावुनि द्वारी ध्वज रोविला मेरूचा ।।१॥
गंगा-यमुना जीवन देती दीपक रवी-शशीचा ।
स्वर्ग - नर्क वैकुंठ - पृथ्वी हा लाभ प्राक्तनाचा ॥२॥
त्रैविधाला राज्य दिधले अधिकार तो तिघांचा |
स्वर्गि राहूनि प्रपंच करितो तुकड्या दास तयाचा ॥३॥