वर विहिर खाली दोर । पाणी ओढि हो ! भरभर
(चल! राजहंस माझा निजला ..)
वर विहिर खाली दोर । पाणी ओढि हो ! भरभर ॥ धृ 0॥
ओढिता ध्वनी तो चाले । की मधुर शब्द कुणि बोले ।
जववरी पाणि ते ओढी । तववरी विहिर ना मोडी I
विहीरीवर हजार नारी I
त्यामध्ये भरी ती झारी ।
विहिर तिची जगतावरी ।
एकाचे झाले अनेक । शेवटिही होती एक ॥१॥
बंद त्या विहिरिचे मुख । पाणि ओढिताति अनेक ।
आधि दोर मग ती घरडी । तववरी विहिर ना मोडी । विहिरीतून उगम नद्यांना । गंगा-सरस्वती-यमुना ।
तुकड्या तो निजखुण सांगे ।
जा आडकुजी-पदि वेगे ।
नदी दिसेल ती सत्संगे ।
धावुनि विहिरी धाडी । तववरी विहिर ना मोडी ॥२॥