ते रुप ओळखा रे ! ओळखा
(चाल: ते रुप पहावे गे बाई..)
ते रुप ओळखा रे ! ओळखा ॥
ओळखा जन्मा येऊन । तेणे चुकतिल जन्ममरण ।
ते रुप ओळखा0।।धृ०।।
द्रौपदिला वस्त्र पुरविले।
अजामेळाते उध्दरिले l
उध्दरिली ती गणिका । ते रुप ओळखा 0 ॥१॥
प्रल्हादास्तव स्तंभि प्रगटले ।
ध्रुवा अढळपदी बसविले ।
उध्दरिले चोखा-बंका । ते रुप ओळखा० ॥२॥
जनिसवे दळण दळियले I
संत सखूसही रक्षिले I
गाजुनि गेला तुका I ते रूप ओळखा० ॥३॥
आडकुजींना तुकडया शरण I
तेणे चुकते जन्म - मरण I
चरणी मन हे राखा I ते रूप ओळखा ० ॥४॥