वळवाच वृत्तिला मागे विषयाहूनि वळवा आधी
(चालः अग वृत्ति कुठे तू जाते..)
वळवाच वृत्तिला मागे विषयाहूनि वळवा आधी ॥धृ०॥
वळवाच संत- सेवेला निरसाया सर्व उपाधी ॥
मिळवाच आत्मसुख साचे साधुनिया ज्ञान-समाधी ॥
हे ग्रंथ सर्व गुंडाळा ।
थांबवा मनाचा चाळा I
निजध्यासि लागु द्या डोळा ।
तप-योग-कर्मकुट सारे लागूच नका त्या नादी ॥१॥
बुध्दिची ज्योत उजळाया आधार गुरु-प्रेमाचा ॥
प्रेमाचे बळ वाढाया आचार हवा नेमाचा ॥
नेमाची दृढता व्हाया हो जोरचि वैराग्याचा ॥
नातरी बोलक्या बोली ।
गुरुगम्य न गवसे खोली ।
मग व्यर्थचि तनु ही गेली ।
तुकड्या म्हणे कामी क्रोधी का मरता वादावादी ? ॥२॥