वळवाया वृत्तिसी करी अजपा सखया !
(चालः पतीतपावन नाम ऐकुनी...)
वळवाया वृत्तिसी करी अजपा सखया ! पठन।
स्वस्थ बैस अंतरी मुराया मानसपण गहन ॥धृ०॥
नको करु खटपटी निश्चळी वृत्ती्वरि राही।
परात्पराला मिळसी जाउन शंका नच काही ॥१॥
स्वानंदाचा तंबू ठोकुनि धर अपुल्या स्थाना।
होइल निर्मल चित्त संतसंगति मिळता जाणा ॥२॥
आडकुजीला ध्याता मन हे स्थिर होइल स्थानी।
तुकड्यादास म्हणे कर संगति जा सद्गुरु-चरणी ॥३॥