गड्या रे ! हा कोट ठेवी दूरी ।
(चाल: निरंतर ध्यास धरी मानसी..)
गड्या रे ! हा कोट ठेवी दूरी ।
पाही मग तू हरी ॥ धृ०॥
हो कोट घालुनि सभ्य तू दिससी
निर्लज्ज होसी वरी ॥
नाही कुणी जेथ पाही गड्या ! तेथ
लक्षी अलक्ष्यपुरी ॥१॥
शंख मृदंग - विणा - आवाजे
वाचा खुंटे वैखरी ॥
तुकडयादास आडकुजी - चरणी
दाविलि सोय बरी ॥२॥