ऐक उध्दवा ! तुला सांगतो खूणचि अजपाची
(चाल: कसा निभवसी काळ कळेना..)
ऐक उध्दवा ! तुला सांगतो खूणचि अजपाची ।
लागे जेणे सहज समाधी सत्य जाण साची ॥धृ0॥
भ्रकुटिस्थानी महेश वसती सोहं तया म्हणती ।
नाभीकमली जिवापासुनी हं शब्दचि निघती ।।
म्हणती हो उच्छ्वास जयाला त्यातचि हंकार ।
कंठी येऊनि निघे सत्वरी सोहं उच्चार ॥१॥
श्वास खेचता सो ये कंठी नाभी मुक्कामी ।
उठते गदगद हं ऐसा चाले सोहं-हंसा चोविसही तास I
जप होतो ऐकवीस हजार सहाशे सावकाश ॥२॥
सत्य टाकुनी लोक पूजिती असत्य पाषाण ।
विशुध्द ओहं - सोहं त्यांनी दिधला टाकून ।।
पुऱ्या मातृका बावन फिरती घेउनिया त्यास ।
तुकड्या सागे सत्य मंत्र हा तार जाणत्यास ॥३॥