श्रीगुरु आडकोजी ! पूर्ण दासाची माय ।
(आरती )
(चाल .आरती ज्ञानराजा,..)
श्रीगुरु आडकोजी ! पूर्ण दासाची माय ।
येवोनि धावत हो ! आज दावि मज पाय ।।धृo॥
धन्य भाग्य वरखेडचे अवतरली मूर्ती ।
असोनिया देही झाली विदेह स्थिंती ॥१॥
अल्पवया माजी हो ! साठवि पंढरीचा राणा।
पायी ध्वज-पद्मांकुश स्थिति न वर्णवे कोणा ॥२॥
असंख्य भक्त तुझे चरणी ठेविती माथा ।
राहीनित्य हृदयी बा ! पुरवी मम मनोरथा ॥३॥
आजान मूर्ति बरवी पाहूनी हेतु पुरवी ।
तुकड्यादास हेचि मागे शिरी वरदहस्त ठेवी ॥४॥