जयदेव जयदेव जय स दगुरूराया !
(आरती)
(चालः जयदेव जयदेव जय पांडुरंगा...)
जयदेव जयदेव जय स दगुरूराया !
अवतरुनीया आला दासा ताराया ॥धृo॥
अक्कलकोट निवासी स्वामी ! तू माझा ।
बुडलो गा ! भवडोही धावे मम काजा ॥१॥
नामस्मरणे ज्याच्या बहु तरती पापी ।
अनंत पुण्यकरुनी दर्शन दे आपी ॥२॥
स्वस्वरुपाचा बोध करुनिया सकळा ।
भक्तजना उध्दरुनी पळवीसी काळा ॥३॥
तव महिमेचा गौरव काय वदू आता ?
तुकड्या ठाव देई स्वामी जगत्राता ! ॥४॥