आम्ही मोकळेचि रेडे I
आम्ही मोकळेचि रेडे । झालो विषयासाठी वेडे ॥ धृ ॥
पुढे कोण जन्म घडे । वाटे होऊ कृमि किडे ॥ १ ॥ नाही दुजा मार्ग आम्हा । जरी न सोड़ू या कामा ॥ २ ॥
तुकड्या म्हणे सांग काही । ब्रीद राख विठ्ठल आई ॥ ३ ॥