आम्ही चुकलो चुकलो I
आम्ही चुकलो चुकलो । भक्ति भावासी मुकलो ॥ धृ ॥
गेलो विषयांच्या वाटे । झालो कपाळकरंटे ॥ १ ॥
श्वानापरी गति झाली । दूरावलो या विठ्ठली ॥ २ ॥
तुकड्या म्हणे दुःख वाटे । कैसा मार्ग आम्हा भेटे ॥ ३ ॥