अखिल विश्‍व-चालक माझा, कृष्ण गोजिरा

अखिल विश्‍व-चालक माझा, कृष्ण गोजिरा ।

करुनिया अकर्ता राही, साक्षि हा पुरा ।।ध्चृ०।।
सृष्टि-खेळ खेळे सदनी ।
बसुनि आपुल्या निजशयनी।

आपणची बघतो नयनी, दृश्य साजिरा ।।१॥।
क्रिडवि गोप-गोपी मेळा।
लावुनी परस्पर डोळा।

राहि तो निराळा भोळा, लिंपि ना जरा ।।२॥।
ज्ञानियांस ज्ञानी दिसतो)
प्रेमियांस प्रेमी गमतो ।

दुर्जनास काळासम तो, भासतो खरा ।।३॥।
सर्व कळा ज्याच्या अंगी।
भाविकांसि भिक्षा मागी ।

विषय सेवुनि वितरागी, झळकतो हिरा।।४॥।।
ध्याति भक्त जे जे त्यासी ।
देइ शांती-दांती श्वासी।

आस पुरविली तुकड्याची, धावुनी त्वरा ।।५।।