काठिण ऐशा रानी वनी ।
कठिण ऐशा रानी वनी । जीव घाबरे आतुनी ॥ धृ ॥
कोण नेई वाटे पार । आड जनावरे क्रूर ॥ १ ॥
हाती मोडकीच काडी । फुटके ढोबर ना फोडी ॥ २ ॥
तुकडया म्हणे भवसागर!। नावाड्याविण नोहे पार ॥ ३ ॥