गेली वेळ बरे झाले I
गेली वेळ बरे झाले I. पुढे आयुष्य राहिले ॥ धृ ॥ काय करी देवराव I. कोठे लाविल ही नाव ॥ १ ॥ आम्ही भ्यालो या संसारी I. पाहोनिया कामवैरी ॥ २ ॥ तुकड्या म्हणे माझा भार I. देवा ! तुझ्या चरणावर ॥ ३ ॥