अनाथासी क्षमादान I
अनाथासी क्षमादान । हे तो थोरांचे भूषण ॥ धृ ॥
जरी चुकलो मार्गी आम्ही । क्षमा द्यावी अंतर्यामी ! ॥ १ ॥
न घड़ो पुढे ऐसी वार्ता । बळ द्यावे देवा! हाता ॥ २ ॥
तुकड्या म्हणे तुझ्याविण । माझा न जावोचि क्षण ॥ ३ ॥