झाली केली लहानपणी I
झाली केली लहानपणी । हूड कर्म रात्रंदिनी ॥ धृ ॥
पोरपणा पोरा आला । परि तो दिवस मागे गेला ॥ १ ॥
न हो आता माझियाने । हेचि देवासी सांगणे ॥ २ ॥
लागो देह हरि कीर्तनी । तुकड्या म्हणे सत्यवाणी ॥ ३ ॥