अंगी नाही भक्ति बळ I
अंगी नाही भक्ति बळ । कैसा सोडील तो काळ? ॥ धृ ॥
नाही प्रेमभाव मनी । देव कैसा येई ध्यानी ? ॥ १ ॥
नाही केला उपकार । तोंडे कैसे व्हावे थोर? ॥ २ ॥
तुकड्या म्हणे मी अधम । देवा! देई तुझे नाम ॥ ३ ॥