झणी काय होते पुढे I
झणी काय होते पुढे । कोण येईल साकडे? ॥ धृ ॥
रिता वेळ जाऊ नये । ऐसे वाटते गे माये! ॥ १ ॥
श्वासो श्वासी नाम घेऊ । दडी देऊनिया राहू ॥ २ ॥
तुकड्या म्हणे मुरवी रुचि । सख्या विठ्ठला! आमुची ॥ ३ ॥