वृत्ति गोपिकांनो! या या, कृष्ण पाहू या
वृत्ति गोपिकांनो! या या, कृष्ण पाहू या ।
कमल फुलवुनी भक्तीचा, मोद सेवु या ।॥।धृ०।॥।
चित्त-चोर भूंगा टपता।
हळूच जाउ लपता छपता ।
बसुनि एके ठायी सगळे, गीत गाउ या 11१ ॥।
सोडुनिया घरचा धंदा।
आणु मुकुंदा या छंदा।
नाचु घेउनी गोविंदा, रंगि रंगु या।।२॥।
मारु मिठी हृदयी धरुनी ।
जीव-भाव हा विसरुनी ।
जाउ मिळुनि जुळुनी त्यासी, स्थीर राहु या ।।३॥।
आधिच्या घरासी सोडू ।
प्रीत कृष्ण-रंगी जोडू
तुकड्याचे तुकडे खंडू, एक होउ या॥।४॥।