कष्ट करिता जन्मवरी I
कष्ट करिता जन्मवरी । सुख नसे तिळभरी ॥ धृ ॥
जैसा बैलचि घ्याण्याचा । तैसा प्रकार आमुचा ॥ १ ॥
कळते अनुभवा येते । परी मन ना वळते ॥ २ ॥
तुकड्या म्हणे देवराया । लावा देह अपुल्या पाया ॥ ३ ॥