अवताराचे कार्य कराया वेळचि अजुनी उरला का ?

(चाल :  कुणि कृष्ण पाहिला का माझा ?..)
अवताराचे कार्य कराया वेळचि अजुनी उरला   का ? ॥धृ 0॥
सांग कुणाला झोप सुखाने येते का खाटेवरती ? ।
अन्र अन्न किती करुनी मरती काळ न याचा सरला   का ॥१॥
स्वार्थासाठी लढता लढता मेले अणि मरणार किती I
याने का झाली शांती ? हा समज कृणा मनि भरला का ?।।२।
द्विषाचे जड मूळचि आहे तोवरती सुख नाही जगी ।
सांगाया हा बोध जिवा नच दिवस अजुनिहीं स्फुरला का ॥३॥
क्रोधाने सत्कार्य स्फुरे ही आजवरी नव्हती वार्ता ।
सत्य कशी होईल अता ? अन्यायाने कृणि तरला  का ? ॥४॥
तुकड्यादास म्हणे तुजवाचूनि कोण निवारिल संकट हे ?
उद्धराया या जगता तू देह    अवनिवरी    धरला   का ? ॥५॥