गुरुविण शांति ना मना जन

गुरुविण शांति ना मना! सांगति हे  सज्जन  जन।। शांति।।धृ०।।
योग-याग जरि करिता, तीर्थ-धाम जरि फिरता ।
व्यर्थ वंचना ।। गुरूविण० ।।१।।
खाती फल-पुष्प कोणि, वनि राहती कोणि ध्यानि ।
भ्रमत वासना ।। गुरुविण० ।।२॥।
सत्‌संगचि हा अमोल, ऐका मम नग्न बोल ।
सुखवि जीवना ।। गुरुविण० ।।३॥।
तुकड्या गुरु-पायि लीन, त्याविण ना अन्य नेम ।
मोक्ष दे क्षणा ।। गुरुविण०|।1४॥।