कोणा घालावे साकडे I
कोणा घालावे साकडे । कोण पुरवील हे कोडे? ॥ धृ ॥
दुजा कोण आहे सांगा । तुम्हाविण पांडुरंगा? ॥ १ ॥
कठिण संसाराचा पाश । कोण निवारील यास? ॥ २ ॥
तुकड्या म्हणे झालो पिसा । नाही क्षणाचा भरवसा ॥ ३ ॥