हरिन सापडले फासी I
हरिण सापडले फासी । त्याची गति होय जैसी ॥ धृ ॥
तैसे झाले माझ्या मनी । कधी निघेन यातूनि ॥ १ ॥
माझे मी यात बांधिलो । आसक्तिने वेडा झालो ॥ २ ॥
तुकड्या म्हणे देवदेवा! । पाश तोडा हे केशवा! ॥ ३ ॥