काळ जातो क्षण - क्षणा I
काळ जातो क्षण-क्षणा । दिसे आमुच्या नयना ॥ धृ ॥
परि ही ओढाळ वासना । न करी हरीच्या स्मरणा ॥ १ ॥
क्षणो क्षणी बाह्य धावे । भोगी जगाचे गोडवे ॥ २ ॥
तुकड्या म्हणे स्थिर करा । बुद्धि अंतरी दातारा! ॥ ३ ॥