घडी वाटे एक करु I
घडी वाटे एक करू । घडी वाटे दुजे धरू ॥ धृ ॥
नाही निभ्रांत हे मन । फिरे दाही दिशा जाण ॥ १ ॥
देव धर्म यासी बहू । स्थिर जरा नाही जीवू ॥ २ ॥
तुकड्या म्हणे गा केशवा!। ध्यान एकाग्री हे लावा ॥ ३ ॥