आम्ही काय करावे ते I
आम्ही काय करावे ते । आमुच्याने काय होते ? ॥ धृ ॥
तुम्ही कृपा करा देवा! । तरिच लागे देही दिवा ॥ १ ॥
तम-अज्ञाने हा जीव । झाला संयोगे निर्जीव ॥ २ ॥
तुकड्या म्हणे तुमच्या कृपे । सर्व मार्ग होती सोपे ॥ ३ ॥