रंग आणा हो रंगणी I
रंग आणा हो रंगणी । देवा! याहो या कीर्तनी ॥ धृ ा॥
आम्ही भोळे भाळे जन । करू मिळोनी स्मरण ॥ १ ॥
काय पाहिजे ते आणा । लाज राखा नारायणा ॥ २ ॥
तुकड्या म्हणे नका पाहू । गुण, दोषी आम्ही जीवू ॥ ३ ॥