गेलेत तुम्ही योग्य वेळ काळ पाहूनी
(चाल : अब तेरे सिवा कौन..)
गेलेत तुम्ही योग्य वेळ काळ पाहूनी ।
फुटके नशीब आमुचेचि जन्मलो अम्ही ॥धृ०॥
बुध्दी दिली तरी न बुध्दिचा विकास हा ।
केलेत यत्नही तरी चुके न त्रास हा I
कोणास सांगण्या न रीघही असे उणी । फुटके नशीब 0 ॥१॥
घरचे सुखी असु परी न अन्न खावया ।
मग दान द्यावया कुठे नि चैन व्हावया ।
मरु द्या असेचि कोण घेत काळजी मनीं । फुटके नशीबo॥२॥
कुठली पुजा नि आरती तशीच किर्तने ? ।
कुठले जपास स्थान देवळे नि तीर्थने ।
बस बंद करो बंद करो ये सदा ध्वनी । फुटके नशीब 0 ॥३॥
मिळतील पिंड का तुम्हास आमुच्या करा ?
गुलाम पुत्र म्हणुनि द्याल काय आसरा ।
आशीश द्या जगास सौख्य लाभवो कुणी |फुटके नशीब0॥४॥
कोणा न दुःख हो असेचि कार्य आपुले ।
केले तुम्हीच धन्य ते तुम्हांस साधले ।
तुकड्या म्हणे अम्हा तसे करा बरे गुणी । फुटके नशीब 0॥५॥