हृदयी स्मरावा शंकर

हृदयी स्मरावा  शंकर ।      रुंडमाळ - गंगाधर ॥
भूतमेळा तो सांगाती । भस्म अंगी नेत्री दिप्ती ॥
व्याघ्रांबर ते   आसन । करी कैलासी  प्रस्थान ॥
सखया! पार्वतीरमणा ! । लागतसे तुकड्या चरणा ॥