स्मरता हरा रात्रंदिन

स्मरता हरा  रात्रंदिन । धन्य होसी,   सत्य   जाण ॥
गजर श्रीरामनामाचा । करी,कैलासी वास ज्याचा ॥
विभूती, गळा मुंडमाला । दैत्यासी जो वश झाला ॥
ज्याचे  त्रिनेत्र   सुंदर ।     नंदीवरी     होई   स्वार ।।
भूत-वेताळांचा मेळा । तुकड्या वंदी पद-कमळा ॥