कोण दया करणार? हरीविण

कोण दया करणार? हरीविण ।। कोण दया०॥|धृ०।।
भवसागर हा दुस्तर तरण्या, जीव त्यात बुडणार ।[ह० ।।१॥।।
सांगति संत लाडके प्रभुचे,   तोचि तारु धरणार   ।।ह०।।२॥।
जन्म-मरण अति डोह भयंकर, चोऱ्यांशी भ्रमणार।।ह०1।३॥।
तुकड्यादास म्हणे भजनाविण,जीव कसा तरणार?।।ह०।।४॥।