साष्टांगेसी नमन करी
दत्तात्रेय
साष्टांगेसी नमन करी । दत्त अवधूत मुरारी ! ।।
श्वानमेळा समागमे । उच्चारिता पावे प्रेमे ।।
दंड - कमंडलू हाती । वेद बोले नेति - नेति ।।
अत्रि - अनुसयेचा सुत । पायी खडावा गर्जत ।
न कळे ब्रह्मादिका पार । तुकड्यादास तो किकंकर ।।