दत्तराज स्वामी माझा

दत्तराज स्वामी माझा । येतो भक्तजना - काजा ।।
बहुत तारीले    पतित । वास   औदुंबर - छायेत ।।
गोश्वानांचा मेळा सवे । दूढ भाव धरिता पावे ।।
शंक-चक्र-गदा हाती । तुकड्यादास देई मती ।।