दत्त पुत्र अनुसयेचा

दत्त पुत्र    अनुसयेचा । दास अंकित मी त्याचा ।
भिक्षा मागे करडपुरी । अवधूत    स्वामी   बरी ।।
दंड - कमंडलू  हाती । श्वान - मेळा तो सांगाती ।।
अविनाशी रूप ज्याचे । वदे तुकड्या सत्य वाचे ॥